जर्मनी मधल्या कडाक्याच्या थंडीपासून सुटका म्हणून ४ दिवस कुठे जात येईल ह्यासाठी आम्ही एखादया ठिकाणाच्या शोधात होतो. थोडंसं research केल्यावर स्पेन मधल्या Mallorca बेटावर जायचं ठरवलं. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रसिद्ध टेनिस पटू राफेल नदाल चं Mallorca हे जन्मस्थान आहे.

Palma de Mallorca हे स्पेन मधील सगळ्यात मोठं बॅलेरिक आयलंड आहे. Palma चे हवामान डिसेंबर मध्ये साधारण १० ते १८ डिग्रीस दरम्यान असते. तिथला मुख्य व्यवसाय हा मासेमारी
असल्याने अनेक प्रकारचे फिश मिळतात. आणि समुद्रकिनारी असलेल्या छोट्या छोट्या शॉप्स मध्ये वेगवेगळ्या पर्सेस, शिंपल्यांचे दागिने, कानातले,ब्रेसलेट्स, स्कार्फस, लहान मुलांची खेळणी अश्या असंख्य प्रकारच्या वस्तू दिसल्या. चुरोज नावाचा Spanish गोड पदार्थ इथल्या स्टॉल्स वर लोकं रांगा लावून घेताना दिसले.
सिटी च्या मध्यभागी असलेलं Cathedral हा तेथील architecture चा एक अतिशय उत्तम नमुना होता. बिस्कीट कलर ची बिल्डिंग आणि समोर डोम सगळ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होती. cathedral च्या वरती गेल्यावर त्याच्या मागच्या बाजूने दिसणारा समुद्र, त्यातल्या बोटी, सूर्याच्या किरणांनी चमकणारे पाणी दुपारच्या १२ च्या उन्हात पण बघत राहावेसे वाटले.


पाल्मा ला अनेक जर्मन tourists जात असल्याने गमतीने इथले लोकं त्याला जर्मनीचे १७ वे राज्य म्हणतात. इथली माणसे सुद्धा जरा समोरासमोर आली कि एकमेकांना Hola (Hello ) म्हंटल्याशिवाय पुढे जात नाहीत. बहुतेक ठिकाणी सगळे सूचना फलक स्पॅनिश,इंग्लिश आणि जर्मन ह्या तीनही भाषांमध्ये दिसले. खूपसे दुकानदार लोकं सुद्धा जर्मन बोलत होते. शहरापासून थोडंसं लांब गेल्यावर तिथले बंगले, घरं पुण्यातल्या जुन्या बंगल्यांची आठवणं करून देणारे वाटले. समुद्र किनारी चालताना नरिमन पॉईंट च्या रस्त्यावर चालत असल्याचा भास झाला. आम्हाला हे शहर खूपसे मुंबई शी साम्य असलेले जाणवले. रस्त्यावर खूप गर्दी, अनेक २ wheelers , समुद्रकिनारी जॉगिंग करणारी माणसे,खाण्यापिण्याचे स्टॉल्स (अर्थात सगळे पिझ्झा आणि French fries चे) मुंबई ची आठवण करून देत होते. संपूर्ण शहर फिरताना बाजूबाजूने निळाशार समुद्र सदैव आपली साथ देत राहतो. काही ठिकाणी मोठ्या फेसाळत्या लाटा दगडांवर आपटत आवाज करतात तर कधी वाऱ्याच्या प्रवाहानुसार स्वच्छ निळे पाणी डोलत राहते. किनाऱ्यालगत असणारे palm trees जणू काही उंच हात हलवून येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करत आहेत कि काय असे वाटते.

Palma जवळच्या सोलेर valley शहरात जाण्यासाठीचा रस्ता तर अप्रतिम होता. एका साईड ला डोंगर मध्ये जेमतेम एक बस जाईल इतका निमुळता रस्ता आणि खाली अथांग समुद्र. वळणावळणाच्या रस्त्याने समुद्राबरोबर लपाछुपी खेळत आम्ही सोलेर ला पोहोचलो. जाताना जवळजवळ १ तास २० मिनिटांचा निसर्गरम्य घाट येताना मात्र स्किप केला आणि दुसऱ्या बस ने एका लांबलचक बोगद्यामधून ४० मिनिटात पाल्मा ला सुखरूप पोचलो.
४ दिवसाची सुट्टी मात्र संपत आली पण Mallorca कडे पर्यटकांना देण्यासारखं अजूनही बरंच काही होतं. निळाशार समुद्र शक्य तेवढा कॅमेरात आणि डोळ्यात साठवून Adios Mallorca ( bye bye) म्हणत आम्ही जर्मनी च्या विमानात बसलो.
Comments
Post a Comment