Posts

Showing posts from 2019

जर्मनी ला जायची पहिली पायरी

Image
पहिल्यांदा मॅक्स म्युलर च्या ऍडमिशन मध्ये नाव वेटिंग लिस्ट वर असल्याने नंतर ऍडमिशन झाली नाही हे कळल्यावर मी मनातून थोडी खुश च होते. पण नंतर MMB च्या सुपर इंटेन्सिव्ह कोर्स ला नाव लागल, आणि सुरु झाला प्रवास जर्मन भाषा शिकण्याचा. २ january २०१८ चा दिवस उजाडला आणि मी इन्स्टिटयूट मध्ये गेले. chrismas च्या सुट्टी नंतरची पहिलीच batch असल्याने विद्यार्थ्यांची खूप गर्दी झाली होती. प्रत्येक वर्षी १३ june ला शाळेत प्रवेश करताना वाटणारी उत्सुकता आणि थोडीशी भीती सगळ्यांच्याच चेहऱ्यावर जा णवत होती. विविध वयोगटातले अनेक लोक अर्थात स्टुडंट्स इन्स्टिटयूट च्या ग्राउंड वर जमले होते. एका मुख्य सरांनी सगळ्या शिक्षकांची ओळख करून दिली आणि आमचे कलासरूम्स कुठे आहेत ते दाखवले. MMB च्या सगळ्या classrooms अतिशय मॉडर्न आहेत. स्मार्ट बोर्ड, कॉम्पुटर, लाऊड स्पीकर, AC अश्या सगळ्या सोयींनी classrooms तुमचं अगदी मनमोकळे पणाने स्वागत करतात. पहिल्याच दिवशी सरांनी त्यांच्या खास शैलीत जर्मन शिकवायला सुरवात केली आणि पहिला शब्द शिकले तो म्हणजे “Hallo” आणि “Guten Morgen” हसत खेळत language शिकायला सुरवात झाली. एक...