जर्मनीतील ऋतुगंध


नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर्मनी मध्ये आमचं आगमन झालं. आम्ही जिथे राहतो तिथे जास्त बर्फ पडत नसल्याचे ऐकले होते. दुसऱ्याच दिवशी मी एक घर बघायला बाहेर पडले आणि अचानक वारा आणि बारीक पाऊस सुरु झाला,ट्राम स्टॉप पर्यंत पोचतेय तोवर बर्फाचे छोटे छोटे गोळे हवेत उडायला लागले,१० मिनिटात  बर्फ थांबला पण मी मात्र जर्मनी मधला माझा पहिला बर्फ पाहिल्याच्या आनंदात होते. ट्राम  मधून जाताना दिसतील त्या गोष्टींचे फोटोज काढत राहिले. जानेवारी  मध्ये मग जास्त बर्फ पडला नाही. 
असेच एकदा फेब्रुवारी  मधल्या शनिवारी सकाळी उठून खिडकीत बघते तर काय सर्वत्र पांढरा गालिचा. शनिवार सकाळ असल्याने बाहेर साधं चिटपाखरूहि दिसत नव्हतं. रात्री थोडासा स्नोफॉल झाल्याने बिल्डिंग च्या परिसरात आणि रस्त्यावर बर्फ दिसत होता. झाडांवर जमा झालेलं फ्रॉस्ट बघायला मज्जा येत होती. कृत्रिम सूर्यप्रकाश ऑफर करण्याऱ्या सलून्स ला ह्या दिवसात मागणी असतेखूप दिवस पुरेसा  सूर्यप्रकाश मिळाल्याने शरीरातील जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक जर्मन लोक अश्या सलून्स चा रस्ता धरतातBrown is beautiful हि सलून वरची tagline  वाचून मग आपल्याला आपल्या गव्हाळ रंगाचा नकळत अभिमान वाटू लागतो. 
 मार्च मध्ये सूर्योदय थोडा थोडा उशिरा होत गेला.आणि थोडी थंडीची सवयही व्हायला लागली होती. - महिन्यात सतत अंगात लेअर कपडे आणि विंटर जॅकेट घालून कंटाळा आला होता. कधी एकदा स्प्रिंग चालू होतोय आणि बिना जॅकेट्स चे आपण फिरतोय असं झालेलं 
इस्टर नंतर साधारण २२ एप्रिल ला इथे स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू सुरु होतो. आणि सगळीकडेच जणू उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. रस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारची छोटी झाडे लावण्यात येतात, लहान मुलांना शाळेमधून घरी कुंड्यांमध्ये छोटी रोपटी लावण्यासाठी बिया वाटप केला जात, मॉल्स मध्ये जिथे शक्य असेल तिथे बहुरंगी फुलांची उधळण होते. डिप्रेससिंग विंटर संपून,इंटरेस्टिंग स्प्रिंग सुरु होतो. अश्या वेळी इथे तापमात साधारण १५ ते २० डेग्रीस मध्ये असतं. स्प्रिंग कलेक्शन  च्या नावाखाली मॉल मध्ये सेल लागतात. एरवी फक्त काळे,राखाडी आणि फार फार तर डार्क निळे कपडे घालणारी इथली माणसे थोडंसं कॉलरफूल, शॉपिंग करतात. घरातील बाल्कनी मध्ये वेगवेगळ्या फुलांनी सजावट केली जाते. 
ह्या सगळ्या महिन्याच्या उत्साहात मग येतो इथल्या ९० टक्के लोकांना आवडणारा ऋतू "Sommer " म्हणजे समर. -१० महिन्यात कधी कधीच दर्शन देणारा रविराज ह्या दिवसात मात्र नित्य नेमाने हजेरी लावतो. भल्या पहाटे वाजल्यापासून उजाडायला सुरवात होते. हिवाळ्यातील  कसर भरून काढण्यासाठी सूर्य रात्री -.३० पर्य्नत तळपत राहतो. जर्मन लोक मग मोठाल्या बास्केट्स भरून खाऊ पिऊ चा सामान घेऊन थेट गार्डन चा रस्ता गाठतात. दिवसभर तिथेच उनाडतात, barbeque करतात.लहान  मुलांपासून, वयोवृद्ध माणसे आपल्या सायकली घेऊन फेरफटका मारताना दिसतात 
पण ज्या  महिन्यांच्या spelling मध्ये “R”  हे लेटर येत नाही ते महिने इथे unpredictable मानले जातात. म्हणजे मे ते ऑगस्ट इथे कधीही पाऊस पडतो, कधीही जोराचा वारा सुटतो,कधी कधी / दिवस फक्त ढगाळ असतं तर कधी तापमात अचानक ३० च्या हि पुढे जात. अगदीक्षणात येते सर सर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडेह्याचा सारखा प्रत्यय येत राहतो 
दिव
साच्या
कोणत्याही वेळी जर आकाशात नजर गेली तर कायम विविध रंगांची रंगपंचमी झालेली दिसते. कधी पांढरे शुभ्र ढग खाली आलेले असतात,कधी स्वच्छ  निळे आकाश खुणावत असते,संध्याकाळच्या वेळी केशरी,गुलाबी,लाल रंगांची उधळण झालेली असते तर कधी cherry on the cake म्हणजे सुंदर इंद्रधनू ची कमान सज्ज असते 

सप्टेंबर पासून पानगळीला सुरवात होते, निसर्ग नियमाप्रमाणे जो ह्या पृथीवर आला त्याला एक ना एक दिवस जायचेच आहे असं म्हणत पाने गळून पडायला लागतात. हळू हळू पानांचे हिरवेगार रंग बदलून त्यांना तपकिरी झाक यायला सुरवात होते. ऑक्टोबर पर्यंत सगळी पाने गळून पडतात. रस्त्यावर पानांचे ढीग साचू लागतात. हवेत पुन्हा एकदा गारवा येतो. गळणाऱ्या पानांबरोबरच आपल्या मनातील राग,द्वेष,दुःख बाजूला सारत लोकसुद्धा Spring आणि Summer  मधल्या रंगीत आठवणी मनात ठेऊन थोड्याश्या नाराजीने का होईना पण थंडीचं स्वागत करायला पुन्हा सज्ज होतात  आणि असं हे निसर्ग चक्र वर्षानुवर्षे असंच चालत राहते.










Comments