डुसेलडॉर्फ ची जत्रा !!

मागच्या महिन्यात वीकएंड ला Dusseldorf ला फिरायला जायचे ठरवले. Dusseldorf हे वेस्ट जर्मनी मधले north rhein westphalia मधलं एक शहर. २८ फेब्रुवारी पासून ते मार्च पर्यंत हे कार्निवल इथे सेलेब्रेट केलं जातं.
आम्ही गेलो तो दिवस शनिवार होता म्हणजे ऑफिस, शाळा, कॉलेज ह्याचं कुठलंच टेन्शन घेता सगळ्या वयोगटातले लोक अतिशय उत्साहात कार्निवल मध्ये भाग घेताना दिसत होते.
सगळ्या लोकांनी वेगळ्या वेशभूषा केलेल्या होत्या. कोणी वाघाचे कपडे घातलेले तर कोणी जोकर बनलेलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर आणि घातलेल्या कपड्यांना शोभतील असा मेक अप केलेला होता.
Dusseldorf च्या सेंट्रल एरिया मध्ये आम्ही पोचलो. ट्रेन मध्येहि हि सगळी कार्निवल ची झुंबड पाहायला मिळत होती

सेंट्रल एरिया सगळ्यात जास्त गर्दीचा दिसत होता. वेगवेगळे स्टॉल्स लावले होते. सगळीकडे मोठ्या आवाजात गाणी लागलेली होती. लोक नुसतीच इथून तिथे मोठ्या संख्येने ग्रुप्स मध्ये फिरताना दिसत होते. कोणी रस्त्यावरच नाचायला सुरु केले तर कोणी तिथेच हातात बिअर ची बाटली पकडून नुसतेच डोलताना दिसले. अनेक रेस्टॉरंट्स आणि पब्स मध्ये फक्त वेशभूषा केलेल्यानाच एन्ट्री होती

हे कार्निवल फक्त तरुणांसाठी नसून ह्यात अनेक आजी आजोबा सुद्धा सामील झालेले. आजी तर खूपच गोड असा मांजरीचा ड्रेस घालून आलेल्या आणि चेहर्या वरचा मेकअप सुद्धा खूपच आखीव रेखीव आणि छान केलेला. खूप दिवसापासून ह्या कार्निवल ची तयारी करत असणार त्या!   / जणीं साधारण साठी  च्या आसपास असणाऱ्या ह्या बायका घरची सारी tensions विसरून कार्निवल च्या उत्साहात सामील होत होत्या.
साधारण १८ ते ३० वयोगट असलेल्या मुलं मुली जागेचं, वेळेचं भान विसरून नुसते दारू पिण्यात आणि नाचण्यात दंग होते. ट्रेन मधून परत जाताना हि हि सगळी माणसे होतीच. ट्रेन मध्ये सुद्धा त्यांची मस्ती काही थांबत नव्हती. एक टारगट मुलांचा ग्रुप तर अतिशय दारू प्यायल्या मुळे फारच  टोकाची मस्ती करत होता,एवढं कि त्यांनी ट्रेन च्या सीट चक्क तोडून घरी न्यायचा प्लॅन केला आणि खरोखरच त्याचं उतरायचं स्टेशन आल्यावर त्यांनी ट्रेन मधल्या सीट काढल्या  आणि  डोक्यावर घेऊन चालायला सुरवात केली. त्यांना थांबवणार, ओरडणारं अस कोणीच नव्हतं

एवढं प्रकार बघून ट्रेन मध्ये असणारे आजी आजोबा त्या बाकीच्या मुलांना ओरडायला लागले. आमच्या वेळी असं नव्हतं आणि आजकाल ची तरुण पिढी खूपच बेशिस्त आहे वगैरे म्हणायला लागले. त्यावर तिथे असलेल्या  बाकीच्या मुलांनी (वय वर्ष साधारण १८-२०) खांदे उडवत सरळ त्या आजोबाना उलटी उत्तर द्यायला चालू केले. आणि आम्ही सीट नेल्या नाहीत, ज्यांनी नेल्या ते तर उतरून गेले मग आम्हाला कशाला बोलताय असे म्हणत तिथून काढता पाय घेतला.

 आत्तापर्य्नत ऐकलेल्या आणि थोडंफार अनुभव घेलेल्या जर्मनी मधल्या शिस्तबद्ध, मोजकं बोलणाऱ्या जर्मन माणसांचा एक वेगळा चेहरा समोर आला.

Comments