इटली ची खाद्य यात्रा !!




इटली ची ट्रिप ठरल्यापासून तिथे जाऊन काय काय खायचे ह्याचे प्लांनिंग सुरु झालेले. पिझ्झा आणि पास्ता जागोजागी असणार हे माहीतच होते पण त्याचबरोबर इतर असंख्य प्रकारचे पदार्थ बघायला मिळाले. 

Napoli हे पिझ्झा चे जन्मस्थान. Italy च्या राणी margherita च्या स्वागतासाठी तिथल्या माणसांनी टोमॅटो,मोझरेला, आणि basil हे इटली च्या झेंड्या चे ३ रंग वापरून पहिला पिझ्झा बनवला.लाल,पांढरा आणि हिरवा रंग पिझ्झा बेस वर विराजमान झाले आणि margherita पिझ्झा चा जन्म झाला.
पिझ्झा वर कायम वेगवेगळे टॉपिंग्स चाखून पहिले. टोमॅटो आणि चीज बरोबर कधी ब्रोकोली, वांग, मश्रूम्स, ऑलिव्ह, पालक, एवढाच काय तर उकडलेला बटाटा पण पिझ्झ्यावर एकदम टेस्टी लागू शकतो हे इटली मध्ये पिझ्झा खाल्ल्यावर समजले.


पास्ता सुद्धा कधी लाल चुटुक टोमॅटो आणि पांढऱ्या शुभ्र चीज ने सजवलेला असायचा तर कधी फक्त लांब लचक पास्ता नूडल्स चीज च्या थराखाली लपलेल्या असायच्या. बाकी सोबतीला ऑलिव्ह ऑइल ,चिली फ्लॅक्स, ऑरगॅनो, काळी मिरी असे छोटेसे बहीण भाऊ पिझ्झा,पास्ता ची रंगत अजूनच वाढवायचे. spaghetti, macaroni , penne सारखाच अजून एक ravioli नावाचा पास्ता सुद्धा बरेच ठिकाणी मिळतो. चौकोनी पास्त्यामध्ये कधी पालक, मश्रूम्स तर कधी चीज भरून वरतून टोमॅटो sauce ने झाकलेली सुंदर डिश डोळ्यासमोर आली कि कधी पटकन पोटात जाते समजत नाही.
risotto हा अजून एक पारंपरिक भाताचा प्रकार इटली मध्ये सर्वत्र पाहायला मिळतो. वेगवेगळ्या भाज्यांचे vegetable broth वापरून तो भाता मध्ये मिक्स केला जातो आणि parmesan चीज बरोबर गरम गरम क्रीमि असा risotto अतिशय चविष्ट लागतो. 


गोड़ पदार्थांमध्ये तर एवढे प्रकार दिसले कि जेवणानंतर स्वीट डिश काय खायची हे ठरवण्यात पहिली १० मिनिटे जायची. gelato हा icecream ब्रँड इटली मधला सर्वात जुना आणि फेमस ब्रँड आहे. एका शॉप मध्ये १५० icecream फ्लेवर्स होते त्यात १०-१५ तर फक्त चॉकोलेट चे बाकी फळांचे,ड्राय
फ्रुटस चे वेगवेगळे फ्लेवर्स. जिथे तिथे फक्त आईस्क्रीमच आईस्क्रीम!!! मन जणू काही एखादं गोड़, रंगीत स्वप्न बघत आहे असेच वाटत होते. अजून एक वेगळा चाखून पाहिलेला पदार्थ म्हणजे Sfogliatella ! त्रिकोणी पॅटिस सारख्या दिसणाऱ्या ह्या शिंपल्यामध्ये आत ricotta चीज भरले जाते. पातळ आणि मऊ लयेर्स असलेल्या ह्या पदार्थाची चव जिभेवर रेंगाळत राहते.

सिटी टूर करता करता मधेच कॉफी ब्रेक तर होतोच. Italian कॉफी ची चव काही निराळीच!! त्या कॉफी च्या सुगंधाने नकळत आपले पाय कॉफी शॉप मध्ये खेचले जातात. कॉफी बरोबर एकदा आम्ही चॉकोलेट आणि पिस्ता क्रीम चे भरलेले छोटेसे कप्स खाल्ले.कडू कॉफी बरोबर काहीतरी स्वीट खायची सवय अख्या युरोप भर परिचित आहे. तो पिस्ता क्रीम ने भरलेला एक छोटासा कप आणि त्याबरोबर कॅप्पीचिनो ची मज्जा काही औरच. असाच सगळ्यांना परिचित असलेला अजून एक पदार्थ मध्ये tiramisu ! केक, क्रीम, कॉफी,कोको पावडर ह्याचे आलटून पालटून ५-६ लयेर्स करून क्रीम आणि चोकोलेटी रंगात दिसायला अतिशय श्रीमंत दिसणारी अशी डिश पोटात अनेक कॅलरीस सकट विराजमान होते. 




रोम आणि नेपोली इथे दोन्ही कडे पाहिलेली रेस्टॉरंट्स ची खासियत म्हणजे बाहेरून अगदी छोटेसे वाटणारे रेस्टॉरंट आतमध्ये माणसांनी खचाखच भरलेले असते. बरेच वेळा टेबल बुकिंग आधी करून जावे लागते. जेवढं मसालेदार आणि तिखट जेवण तेवढं ते चविष्ट हा नियम इटालियन फूड मोडून काढते. लोक जेवणात स्टार्टर्स म्हणून २५० ग्राम चीज मागवू शकतात हेबघून आश्चर्य वाटले



७ दिवसांच्या ट्रिप नंतर सुद्धा अजून एक दोन ठरवलेले पदार्थ खायचे राहिलेच, पण trevi fountain मध्ये एक नाणं टाकलंय त्यामुळे इटली ला परत जायचा योग नक्की येणार असा मानायला हरकत नाही.
अनेक जण नवीन वर्षात वजन कमी करू, फिट राहू गोड़ कमी खाऊ असे संकल्प करतात आम्ही मात्र २ January ला इटली मधल्या लास्ट डिनर च्या निम्मिताने चीज पिझ्झा आणि चॉकोलेट डोनट वर ताव मारला आणि आमची "Eataly" ट्रिप संपवली.








Comments