Posts

आंबव उत्सव २०२०

Image
सकाळी ७ ची वेळ,देवळात गुरुजींचे मंत्रपठण सुरु आहे,देवळाच्या मागच्या बाजूला बायकांची स्वयंपाकाची गडबड सुरु आहे. एक एक तास गायत्री मंत्रपठण करण्यासाठी साठी तरुण मुले तयार आहेत,आणि गाभाऱ्यात श्री सूर्यनारायणाची मूर्ती नखशिखान्त सजलेली आहे. हे दृश्य आमच्या आंबव च्या श्री सूर्यनारायणाच्या उत्सवाचे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणारा हा उत्सव रथसप्तमीपर्यंत चालू असतो. दरवर्षी नित्यनेमाने आम्ही सगळे आंबवला जातो. मे महिन्यात नावाप्रमाणेच आंब्यांच्या राशीने भरलेले हे इटुकले ग ाव उत्सवाच्या वेळी माणसांनी भरून जाते. उत्सवाचे यजमानपद हे ६ घरात वाटले गेले असल्याने आमच्याकडे दर ६ वर्षांनी हा उत्सव असतो.  जानेवारी महिना सुरु झाला कि सगळ्यांना आंबव ला जायचे वेध लागतात. मला कधीच असे वाटले नव्हते कि मी कीर्तन हा प्रकार ऐकीन. पण ह्याची सवय आंबव मधेच लागली. दर रात्री होणारे कीर्तन हा उत्सवाचाच एक भाग. मस्त गुलाबी थंडीत अंगावर शाल पांघरून कधी देवळात तर कधी घरातल्याच झोपाळ्यावर झुलत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकल्यावर आपण कुठेतरी वेगळ्याच दुनियेत असल्याचा भास होतो. लळिताच्या कीर्तनानंतर मिळ...

जर्मनीतील ऋतुगंध

Image
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जर्मनी मध्ये आमचं आगमन झालं . आम्ही जिथे राहतो तिथे जास्त बर्फ पडत नसल्याचे ऐकले होते . दुसऱ्याच दिवशी मी एक घर बघायला बाहेर पडले आणि अचानक वारा आणि बारीक पाऊस सुरु झाला , ट्राम स्टॉप पर्यंत पोचतेय तोवर बर्फाचे छोटे छोटे गोळे हवेत उडायला लागले , १० मिनिटात   बर्फ थांबला पण मी मात्र जर्मनी मधला माझा पहिला बर्फ पाहिल्याच्या आनंदात होते . ट्राम   मधून जाताना दिसतील त्या गोष्टींचे फोटोज काढत राहिले . जानेवारी   मध्ये मग जास्त बर्फ पडला नाही .   असेच एकदा फेब्रुवारी   मधल्या शनिवारी सकाळी उठून खिडकीत बघते तर काय सर्वत्र पांढरा गालिचा . शनिवार सकाळ असल्याने बाहेर साधं चिटपाखरूहि दिसत नव्हतं . रात्री थोडासा स्नोफॉल झाल्याने बिल्डिंग च्या परिसरात आणि रस्त्यावर बर्फ दिसत होता . झाडांवर जमा झालेलं फ्रॉस्ट बघायला मज्जा येत होती . कृत्रिम सूर्यप्रकाश ऑफर करण्याऱ्या सलून्स ला ह्या दिवसात मागणी असते .  खूप दिवस पुरे...