आंबव उत्सव २०२०
सकाळी ७ ची वेळ,देवळात गुरुजींचे मंत्रपठण सुरु आहे,देवळाच्या मागच्या बाजूला बायकांची स्वयंपाकाची गडबड सुरु आहे. एक एक तास गायत्री मंत्रपठण करण्यासाठी साठी तरुण मुले तयार आहेत,आणि गाभाऱ्यात श्री सूर्यनारायणाची मूर्ती नखशिखान्त सजलेली आहे. हे दृश्य आमच्या आंबव च्या श्री सूर्यनारायणाच्या उत्सवाचे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणारा हा उत्सव रथसप्तमीपर्यंत चालू असतो. दरवर्षी नित्यनेमाने आम्ही सगळे आंबवला जातो. मे महिन्यात नावाप्रमाणेच आंब्यांच्या राशीने भरलेले हे इटुकले ग ाव उत्सवाच्या वेळी माणसांनी भरून जाते. उत्सवाचे यजमानपद हे ६ घरात वाटले गेले असल्याने आमच्याकडे दर ६ वर्षांनी हा उत्सव असतो. जानेवारी महिना सुरु झाला कि सगळ्यांना आंबव ला जायचे वेध लागतात. मला कधीच असे वाटले नव्हते कि मी कीर्तन हा प्रकार ऐकीन. पण ह्याची सवय आंबव मधेच लागली. दर रात्री होणारे कीर्तन हा उत्सवाचाच एक भाग. मस्त गुलाबी थंडीत अंगावर शाल पांघरून कधी देवळात तर कधी घरातल्याच झोपाळ्यावर झुलत कीर्तनकारांचे कीर्तन ऐकल्यावर आपण कुठेतरी वेगळ्याच दुनियेत असल्याचा भास होतो. लळिताच्या कीर्तनानंतर मिळ...