जर्मनी ला जायची पहिली पायरी


पहिल्यांदा मॅक्स म्युलर च्या ऍडमिशन मध्ये नाव वेटिंग लिस्ट वर असल्याने नंतर ऍडमिशन झाली नाही हे कळल्यावर मी मनातून थोडी खुश च होते. पण नंतर MMB च्या सुपर इंटेन्सिव्ह कोर्स ला नाव लागल, आणि सुरु झाला प्रवास जर्मन भाषा शिकण्याचा.
२ january २०१८ चा दिवस उजाडला आणि मी इन्स्टिटयूट मध्ये गेले. chrismas च्या सुट्टी नंतरची पहिलीच batch असल्याने विद्यार्थ्यांची खूप गर्दी झाली होती. प्रत्येक वर्षी १३ june ला शाळेत प्रवेश करताना वाटणारी उत्सुकता आणि थोडीशी भीती सगळ्यांच्याच चेहऱ्यावर जाणवत होती. विविध वयोगटातले अनेक लोक अर्थात स्टुडंट्स इन्स्टिटयूट च्या ग्राउंड वर जमले होते.
एका मुख्य सरांनी सगळ्या शिक्षकांची ओळख करून दिली आणि आमचे कलासरूम्स कुठे आहेत ते दाखवले.
MMB च्या सगळ्या classrooms अतिशय मॉडर्न आहेत. स्मार्ट बोर्ड, कॉम्पुटर, लाऊड स्पीकर, AC अश्या सगळ्या सोयींनी classrooms तुमचं अगदी मनमोकळे पणाने स्वागत करतात.
पहिल्याच दिवशी सरांनी त्यांच्या खास शैलीत जर्मन शिकवायला सुरवात केली आणि पहिला शब्द शिकले तो म्हणजे “Hallo” आणि “Guten Morgen”
हसत खेळत language शिकायला सुरवात झाली. एकदा चुकून “mein Opa” म्हणजे मराठी मध्ये ''माझे आजोबा'' च्या ऐवजी मी चुकून meine Opa म्हणजे ''माझी आजोबा" अस म्हंटलं.... सरांनी मला सगळ्या वर्गासमोर बोर्डवर सगळे फॉर्म्स लिहायला लावले. एकदम शाळेत असताना बाई शिक्षा करायच्या तसं वाटलं पण असे अनेक किस्से सगळ्यांच्याच बाबतीत घडत होते.
A1 , A2 लेव्हल्स होत गेल्या तसं भाषेमधील grammar हळू हळू समजायला लागत होतं. day to day life मध्ये वापरात असणाऱ्या वस्तूंची जर्मन नावे कळायला लागली होती. भाषेबरोबरच ती बोलताना त्यातील उच्चार किती महत्वाचे असतात जे कळले.भाषा लिहिणे,वाचणे, बोलणे आणि ऐकणे ह्या चार गोष्टींचा समांतर अभ्यास सुरु झाला. मोडकं तोडकं जर्मन बोलता येऊ लागलं. आमच्या अस्खलित मराठीमध्ये जर्मन शब्दांचा शिरकाव झाला होता आणि मग एकमेकांशी बोलताना मधेच कुठेतरी "आज किती Kalt आहे ना'' किंवा ''अरेरे schade झालं" अशी मिश्रित वाक्य बनू लागली.
नंतर B1 आणि B2 ला अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स, गेम्स ह्या सगळ्यातून भाषेचं सौंदर्य उलगडत गेलं. एका चित्रावरून अख्खी गोष्ट लिहिणे, movies बघणे, गाणी ऐकणे, लायब्ररी मधली मॅगझिन्स आणि पुस्तके वाचणे ह्यातून जर्मन शिकायला खूप मदत झाली.
प्रत्येक लेवल साठी असणारे टीचर्स आणि त्यांची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी होती पण परीक्षेपेक्षा सुद्धा भाषा समजून घ्या, ती जमेल तिथे वापरा, भरपूर वाचन करा आणि जास्तीत जास्त जर्मन मध्ये बोला ह्यावरच सगळ्यांचा भर होता. अश्या खेळीमेळीच्या वातावरणामुळे एका सर्टिफिकेट साठी भाषा शिकतोय असे कधीच वाटले नाही.
जर्मन शिकताना फक्त भाषाच नाही तर जर्मनी हा देश,तिथले लोक, हवामान, प्रेक्षणीय स्थळे, त्यांचं cuisine ह्या सगळ्याशी ओळख निर्माण झाली.
आधी भाषा शिकायला थोडीशी कमी उत्सुक असलेली मी आता इथे जर्मनी मध्ये आल्यावर भाषा शिकणं किती महत्वाचं होतं हे कळतंय.
काही विचारण्यासाठी आपण जर्मन मध्ये बोलायला सुरवात केल्या नंतर गोष्टी इथले लोक जरा २ गोष्टी जास्त सांगतात हा अनुभव पहिल्या २ दिवसात आला.
अजून बराच प्रवास बाकी आहे, खूप जर्मन वाचायचं आहे, नवीन जर्मन लोकांशी ओळख करून घ्यायचीय. आता तर जर्मन भाषा सुधारण्याचे अनेक पर्याय समोर आहेत. त्यांचा पुरेपूर वापर करायचं ठरवलंय.
theory तर मॅक्स म्युलर मध्ये शिकले इथे रोजच प्रॅक्टिकल exam चालू आहे.



Comments